हवेत तीन तास जिवंत राहतो कोरोना!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’च्या (एनईजेएम) अभ्यासातील निष्कर्षानुसार कोरोना विषाणू हवेत तीन तास, तसेच तांबे धातूवर चार तास, कागदावर 24 तास तर स्टील आणि प्लॅस्टिकवर दोन ते तीन दिवस जिवंत राहतो. कोरोनाबाधित व्यक्तीच्या शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या छोट्या थेंबांवर हा विषाणू जिवंत राहतो.

कोविड-19 आणि ‘सार्स’चे विषाणू

कोरोना विषाणूचा इतक्या झपाटय़ाने फैलाव कसा काय झाला याचे कारण शोधण्यासाठी केलेल्या अभ्यासात ‘कोविड-19’ आणि 2002-03 मध्ये फैलाव झालेल्या सीव्हर ऍक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोमचा (सार्स) विषाणू यात साम्य आढळले आहे.

कोरोनाचा झपाटय़ाने फैलाव का?

कोरोना आणि सार्सच्या विषाणूमध्ये काही असमानता आढळली आहे. यात कोरोना विषाणूच्या वेगवान फैलावाचे कारण लपले आहे. अभ्यासातील निष्कर्षानुसार वरच्या श्वसननलिकेमध्ये जास्त विषाणूचे वास्तव्य आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांची संसर्ग फैलावण्याची क्षमता ही कोरोनाच्या वेगवान फैलावाची कारणे आहेत.

79 टक्के नवीन रुग्णांना लक्षणे दिसून न आलेले रुग्ण जबाबदार

कोरोना विषाणूच्या फैलावाला लक्षणे दिसून न आलेल्या रुग्णांचा अधिक धोका असल्याचे अभ्यासात उघड झाले आहे. चीनमध्ये केलेल्या सर्वेक्षणातही याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनमध्ये 79 टक्के कोरोनाग्रस्तांना संसर्गाची लक्षणे दिसून न आलेले रुग्ण जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे.

आरोग्य कर्मचाऱयांना अधिक धोका

कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी लढणाऱया आरोग्य कर्मचाऱयांच्या जीवितालाही सर्वाधिक धोका असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. विशेषतŠ अतिदक्षता विभागात (आयसीयू) श्वसनविकाराच्या गंभीर रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱया आरोग्य कर्मचाऱयांना धोका जास्त संभवतो. याआधी जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) आरोग्य कर्मचाऱयांना विशेष सावधानगिरी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.