
जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील विशेष वार्डात कोरोनाचा संशयित रुग्ण दाखल झाला आहे. या रुग्णाचे अद्याप निदान झालेले नाही. परंतु कोरोनाच्या संशयीवरुन त्याचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या नमुन्यांच्या तपासणीनतरच त्याला कोरोनाची लागण झाली किंवा नाही हे स्पष्ट होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी सांगितले.
सदरचा रुग्ण मुंबई येथे दादर पोलीस स्टेशनमधील कर्मचारी असून त्याचा इस्त्राईलच्या कमांडोशी संपर्क आला होता, असे सांगण्यात आले. मुंबईहून जालना येथे आल्यानंतर त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना संदर्भातील विशेष कक्षात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी सांगितले.
























































