देशात होणार प्रदूषणरहित हायड्रोजन इंधनाचे उत्पादन; इंडियन ऑईल, एल ऍण्ड टी, रिन्यूची संयुक्त कंपनी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात प्रदूषणरहित हायड्रोजन इंधन तयार करण्यासाठी इंडियन ऑईल, एल ऍण्ड टी आणि रिन्यू या तीन बलाढय़ कंपन्या एकत्र आल्या आहेत. या तीन कंपन्यांनी आज सामंजस्य करार करून संयुक्त कंपनी स्थापन केली. यावेळी एल ऍण्ड टीचे सीईओ, महाव्यवस्थापक एस. एन. सुब्रमणीयम, इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य आणि रीन्यू पावर कंपनीचे सीईओ सुमंत सिन्हा उपस्थित होते. त्यामुळे देशात प्रदूषणरहित इंधनाला मोठी चालना मिळणार आहे.

देशात प्रदूषणरहित इंधनावर मोठा भर दिला जात असून नागरिकही प्रदूषणरहित सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. त्यात आता हायड्रोजन इंधनाची भर पडणार आहे. हायड्रोजन इंधनाच्या उत्पादनासाठी आज इंडियन ऑईल, एल ऍण्ड टी आणि रिन्यू यांनी सामंजस्य करार केला. नव्या कंपनीच्या बांधणीचे काम एल ऍण्ड टी करणार असून इंडियन ऑईल तेल शुद्धीकरणातील तज्ञांची मदत देणार आहे तर रिन्यू पावर कंपनी प्रदूषणरहित इंधनासंदर्भातील मार्ग विकसित करणार आहे. त्याचबरोबर हायड्रोजन इंधनासाठी लागणाऱया घटकांचे उत्पादन आणि विक्रीसाठी इंडियन ऑईल आणि एल ऍण्ड टी कंपनीने दुसरी संयुक्त कंपनी बनवली आहे.