
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना शनिवारी विशेष एनआयए न्यायालयाने पुन्हा ताकीद दिली. 25 एप्रिलच्या सुनावणीवेळी हजर राहा, अन्यथा कठोर आदेश देऊ, असे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी यांना बजावले. त्यांच्या वकिलांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करीत हजेरीपासून सूट मागितली. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणीला हजर राहण्याचे सक्त निर्देश साध्वी यांना दिले.


























































