कॉलेजियम पॅनलच्या बैठकीची माहिती सार्वजनिक करण्यास न्यायालयाचा नकार

न्यायमूर्तींच्या नियुक्तीबाबत झालेल्या कॉलेजियम पॅनलची माहिती सार्वजनिक करण्यास सर्वोच्च न्यायालयाने साफ नकार देत त्याबाबत दाखल झालेली याचिका फेटाळली आहे. कॉलेजियम बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती जनतेसमोर ठेवली जाऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगतानाच बैठकीत काय निर्णय  झाला हे जाहीर केले जाऊ शकते, असेही त्यानी स्पष्ट केले आहे.