
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्यभरात गाईच्या दूध विक्री दरात येत्या 8 जूनपासून प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ होणार आहे. या वाढीमुळे दुधाचा दर प्रति लिटर 42 रुपयांवरून 44 रुपयांवर जाणार आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अमूल, मदर डेअरी कंपनीच्या दुधाचे दरही अलीकडेच दोन रुपये प्रति लिटर दरांनी वाढले आहेत. तत्पूर्वी, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाईच्या दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यापाठोपाठ बुधवारी पुण्यात झालेल्या खासगी सहकारी दूध उत्पादकांच्या बैठकीत अन्य दूध उत्पादकांनीही दरवाढीचा निर्णय घेतला.


























































