दूधाचा चटका, गाईचे दूध 2 रुपयांनी महागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
milk-1
म्हशीच्या दुधात जास्त प्रथिनं असतात. तर गायीच्या दुधात कमी प्रथिनं असतात. म्हणूनच म्हशीचे दुध पचण्यास थोडं जड असतं.

सामना ऑनलाईन । पुणे

गाईच्या दूधाचे दर वाढणार असल्याची घोषणा दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघटनेकडून करण्यात आली असून आता गाईचे दूध 2 रुपयांनी महागणार आहे. मुंबई-पुण्यात 42 रुपये प्रति लिटर दूध आता 44 रुपये प्रति लिटर होणार आहे. 8 जून पासून दरवाढ लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गोकुळ, वारणा, मदर डेअरी या दूध संघांनी आधीच 1 जून पासूनच गाईच्या दूधाच्या दरात दोन रुपये दरवाढ केली आहे. त्यामुळे या संघाकडून पुन्हा दरवाढ होणार नाही. परंतु ज्या दूध उत्पादक संघांनी 1 जून रोजी दरवाढ केली नव्हती त्यांच्याकडून 2 रुपये दरवाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादनाचा खर्च परवडत नसल्याने दर वाढ करण्याची मागणी दूध उत्पादक संघांकडून करण्यात आली होती.

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघटनेची बैठक मंगळवारी पुणे येथे बोलवण्यात आली होती. खासगी आणि सहकारी अशा सर्व दूध उत्पादक आणि प्रकिया संघांचा सहभाग होता. यावेळी गाईच्या दूधाच्या दरात दोन रुपये दर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या दूध उत्पादक संघांनी या आधीच गाईच्या दूधाच्या दरांत वाढ केली आहे त्यांना ही दरवाढ करता येणार नाही, असी माहिती संघटनेचे सचिव प्रकाश कुथवळ यांनी दिली आहे.