ऑस्ट्रेलियाने रोखली इंग्लंडची विजयी घोडदौड

ऑस्ट्रेलियाने बुधवारी मध्यरात्री येथे झालेल्या वन डे लढतीत संस्मरणीय व विक्रमी कामगिरी केली. यजमान इंग्लंडकडून मिळालेल्या 303 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 73 धावा अशी बिकट झाली होती. मात्र अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल व यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरी या जोडीने 212 धावांची भागीदारी करताना इंग्लंडच्या मालिका विजयाच्या स्वप्नांना सुरुंग लावला. दोघांच्या देदीप्यमान शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही लढत तीन गडी राखून जिंकली. या पराभवासह इंग्लंडची 2015 सालापासून सुरू असलेली मायदेशातील विजय मालिकाही खंडित झाली. तसेच 2017 सालानंतर त्यांना पहिल्यांदाच वन डे मालिकेत पराभव पत्करावा लागलेला आहे. एक शतक व एक अर्धशतकासह या मालिकेत 186 धावा तडकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची सामनावीर तसेच मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला.

  • मॅक्सवेल, कॅरीची धडाकेबाज शतके
  • कांगारूंनी 2-1 अशा फरकाने वन डे मालिका जिंकली
  • प्लेयर ऑफ दी मॅच आणि सीरिज – ग्लेन मॅक्सवेल

सणसणीत भागीदारी

डोqव्हड वॉर्नर (२४ धावा), अॅरोन फिंच (१२ धावा), मार्वâस स्टोयनीस (4 धावा), मार्नस लॅबुशेन (20 धावा), मिचेल मार्श (2 धावा) या फलंदाजांना अपयश आल्यानंतर अॅलेक्स कॅरी व ग्लेन मॅक्सवेल या जोडीने कांगारूंसाठी किल्ला लढवला. ग्लेन मॅक्सवेल याने ‘हवाईहल्ल्यांवर’ जोर दिला, तर अॅलेक्स कॅरी याने जमिनीवरील फटक्यांसह धावा वसूल केल्या. दोघांनी 212 धावांची सणसणीत भागीदारी करीत सामन्याला कलाटणी दिली. अॅलेक्स कॅरीने 114 चेंडूंत दोन षटकार व सात चौकारांसह 106 धावांची तर ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या 90 चेंडूंत सात गगनभेदी षटकार, चार नेत्रदीपक चौकारांसह 108 धावांची दमदार खेळी साकारली. अॅलेक्स कॅरीने वन डेतील पहिले, तर ग्लेन मॅक्सवेलने दुसरे शतक झळकावले. दोघे बाद झाल्यानंतर मिचेल स्टार्कने अदिल रशीदच्या एका षटकात एक षटकार व एक चौकार मारत कांगारूंच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या आकडेवारीवर एक नजर

  • या लढतीत तीन शतके झळकाविली गेली. तसेच 15 षटकारांसह 607 धावांचा पाऊस पडला.
  • या लढतीत सहाव्या क्रमांकापासून खाली फलंदाजी करणाऱ्या चार खेळाडूंनी अर्धशतकापेक्षा जास्त धावा तडकावल्या. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स कॅरी, खिस वोक्स व सॅम बििंलग्स यांचा समावेश आहे. वन डे क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच घडले.
  • पाच फलंदाज बाद झाल्यानंतर सर्वाधिक धावांचा पाठलाग करणाऱ्या लढतींच्या यादीत ही लढत पहिल्या स्थानावर पोहोचलीय. ऑस्ट्रेलियाने 73 धावांमध्ये पाच फलंदाज गमावले होते. त्यानंतर त्यांनी 230 धावांचा पाठलाग केला.
  • इंग्लंडने 2015 सालापासून मायदेशात सलग नऊ मालिकांमध्ये विजय मिळवला होता. ही मालिका आता खंडित झालीय. तसेच 2017 सालामध्ये त्यांना हिंदुस्थानविरुद्ध मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता तीन वर्षांनंतर त्यांनी वन डे मालिका गमावली आहे.

बेअरस्टॉचे शतक

दरम्यान, याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर जॉनी बेअरस्टॉ याने दोन षटकार व 12 चौकारांसह 112 धावांची खेळी केली. हे त्याचे वन डेतील 10वे शतक ठरले. सॅम बिंलग्सने 57 धावांची आणि खिस वोक्सने नाबाद 53 धावांची खेळी करीत इंग्लंडला 302 धावांचा टप्पा गाठून दिला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने डावातील पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला आणि दुसऱ्या चेंडूवर जो रूटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मिचेल स्टार्कसह अॅडम झाम्पानेही तीन फलंदाज बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या