सचिन तेंडुलकर हॉस्पिटलमध्ये दाखल, ट्वीट करून नागरिकांना करून दिली त्या दिवसाची आठवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sachin-tendukar

कोरोनाग्रस्त असलेला माजी क्रिकेटपटू महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सचिननं ट्वीट करून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्वीट मध्ये तो म्हणतो की, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. लवकरच मी हॉस्पिटलमधून बरा होऊन घरी परतेन असा विश्वासही त्यानं व्यक्त केला आहे. सचिन कोरोनाग्रस्त असून 27 मार्च रोजी त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. चाहत्यांनी त्याची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना, शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत.

आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या, शुभेच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचं सचिननं आपल्या ट्वीटमधून आभार मानले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर त्याने एका विशेष दिवसाची आठवण करून दिली.

सचिनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, हिंदुस्थान वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या दशकपूर्ती निमित्त सर्व हिंदुस्थानी नागरिकांना आणि टीममधील माझ्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा. 2 एप्रिल, 2011 रोजी हिंदुस्थानने दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकाला होता. 1983 नंतर विश्वविजेता बनण्याची टीम इंडियाची ही दुसरी वेळ होती.