चेंडूला थुंकी लावण्यास बंदी; मांकडिंग आता धावबाद, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार नवे नियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटमधील थरार वाढविण्यासाठी आणि खेळात अधिक अचूकता आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठे बदल करण्यात आले आहेत. क्रिकेटमधील नियम बनविण्याचा अधिकार असलेल्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) बुधवारी या बदलाची घोषणा केली. मात्र हे नवीन बदल यावर्षी 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. म्हणजेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आधी क्रिकेट नियमातील नवीन बदल लागू होणार आहेत.

एमसीसीने आता क्रिकेटमध्ये चेंडूला चमकविण्यासाठी थुंकीचा वापर करण्यास बंदी घातली आहे. याआधी कोरोनामुळे चेंडूला थुंकी लावण्यास बंदी घालण्यात आली होती, मात्र आता एमसीसीने केलेल्या नव्या नियमानुसार चेंडूला थुंकी लावता येणार नाही. कारण चेंडूवर थुंकी लावण्यासाठी खेळाडू साखरेच्या काही पदार्थांचा वापर करत असत. यामुळे चेंडूवर थुंकी लावणे म्हणजे त्याच्या स्थितीमध्ये बदल करणे यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. क्रिकेटच्या नियमात 2017 साली मोठे बदल करण्यात आले होते. त्यानंतर 2019 मध्ये किरकोळ स्करूपाचे बदल करण्यात आले होते, मात्र आता 2022 मध्ये क्रिकेटच्या नियमात पुन्हा मोठे बदल करण्यात आले आहेत.

मांकडिंगचे नामकरण आता धावबाद

आयसीसीने मांकडिंगसंदर्भात मोठा बदल केला आहे. मांकडिंग म्हणजे गोलंदाजाने चेंडू टाकायच्या आधी नॉनस्ट्राइक फलंदाजाने क्रीझची रेषा सोडल्यास गोलंदाज चेंडू यष्टय़ाला लावून त्याला बाद करत असे. याआधी क्रिकेट लॉ 41 नुसार ही गोष्ट खेळ भाकनेच्या किरोधात मानली जात होती. मात्र, आता मांकडिंग प्रकाराला क्रिकेट लॉ 38 नुसार धावबाद म्हटले जाईल. गेल्या काही वर्षांत यावरून अनेकदा वाद झालेले आहेत. हिंदुस्थानचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आयपीएल 2019 मध्ये अशा पद्धतीने जोस बटलरला बाद केले होते. त्यावरही मोठा वाद झाला होता. एका कसोटी सामन्यात हिंदुस्थानचे विनू मांकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या किल ब्राऊन यांना अशा पद्धतीने सर्वप्रथम बाद केले होते. त्यानंतर विनू मांकड यांच्या आडनावावरून त्याला ‘मांकडिंग’ असे म्हटले जात होते.

नवा फलंदाज स्ट्राइक घेणार

नक्या नियमानुसार बाद झालेल्या खेळाडूच्या जागेवर येणाऱ्या नव्या फलंदाजाला आता स्ट्राइकच घ्यावी लागणार आहे. बाद झालेल्या खेळाडूने स्ट्राइक बदलली असली तरी नवा फलंदाज हा स्ट्राइकच घेणार आहे. आतापर्यंत एखाद्या फलंदाज जर झेलबाद होण्याआधी दुसऱया फलंदाजाला क्रॉस केले असेल तर नवा फलंदाज नॉनस्ट्राइकवर जात असे. षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर दुसऱया बाजूचा फलंदाज नव्या षटकाच्या पहिल्या चेंडूकर स्ट्राइक घेतो. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत हा नियम लागू केला होता.

डेड बॉलच्या नियमात बदल

डेड बॉलच्या नियमातदेखील बदल करण्यात आलाय. सामना सुरू असताना मैदानावर कोणत्याही व्यक्ती, प्राणी किंवा अन्य कोणत्याही वस्तूमुळे कोणत्याही संघाचे नुकसान होत असेल, तर तो बॉल डेड बॉल मानला जाईल. मैदानात अचानक घुसणाऱ्या प्रेक्षकामुळे किंवा कुत्र्यामुळे खेळावर काही परिणाम झाला तर मैदानाकरील पंच कॉल घेतील आणि संबंधित बॉल डेड बॉल दिला जाऊ शकतो.