जसप्रीत बुमराहची बायको आहे अस्सल पुणेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह याने नुकतीच सुप्रसिद्ध सूत्रसंचालक संजना गणेशन हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की संजना ही पुण्याची आहे.

संजना ही अस्सल पुणेकर असून तिने मिस इंडिया स्पर्धेतही भाग घेतला होता. मॉडेलिंगकडून तिने हळूहळू आपला मोर्चा सूत्रसंचालनाकडे वळवला होता.

क्रीडा सूत्रसंचालन हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने तिने यातच आपली कारकीर्द करण्याचं ठरवलं होतं. संजनाने क्रिकेटसह इतरही क्रीडास्पर्धांसाठी सूत्रसंचालन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sanjana Ganesan (@sanjanaganesan)

संजनाने बी टेक केले असून तिने सुवर्ण पदक पटकावले आहे. शिक्षण झाल्यानंतर तिने आयटीमध्ये नोकरीही केली होती. नंतर तिने पूर्णवेळ मॉडेलिंगकडे लक्ष दिले.

2014 साली एमटीव्हीच्या स्प्लिट्सव्हिला या कार्यक्रमात सहभागी झाली होती, परंतु दुखापत झाल्यामुळे ती या शोमधून बाहेर पडली होती.

View this post on Instagram

A post shared by Sanjana Ganesan (@sanjanaganesan)

संजनाने अनेक क्रिकेटच्या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन केले आहे. त्यात आयपीएल आणि 2019 च्या वर्ल्डकपचा समावेश आहे. आयपीलसाठी तिने कोलकाता नाईट रायडरच्या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sanjana Ganesan (@sanjanaganesan)

फक्त क्रिकेटच नाही तर बॅडमिंटन आणि फुटबॉलच्या कार्यक्रमांचेही सुत्रसंचालन संजनाने केले आहे.  त्यात बॅडमिंटन लीगच्या दिल से इंडियनचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Sanjana Ganesan (@sanjanaganesan)