समुद्राच्या आत आढळला 7 हजार वर्षं जुना रस्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समुद्राच्या पोटात अनेक रहस्य दडून राहिली आहेत. कधी बुडालेल्या जहाजातला खजिना तर कधी संपूर्ण शहर असं काहीही समुद्राच्या पोटात आढळतं. पण, क्रोएशिया तटानजीक समुद्राच्या आत सुमारे 7 हजार वर्षं जुना दगडी रस्ता आढळला आहे.

व्ह्रार नावाच्या एका संस्कृतीच्या काळात हा रस्ता बनवला गेल्याचा निष्कर्ष जडार विद्यापीठाच्या पुराणवस्तु संशोधकांनी काढला आहे. या क्रोएशियाच्या दक्षिण भागातील तटानजीक समुद्रात 16 फुटांवर सोलिन नावाच्या शहरातला हा रस्ता आहे. या रस्त्यावरून लोक कोरकुला नावाच्या बेटावर जात असता.

फक्त रस्ताच नव्हे तर अख्ख शहर समुद्राच्या पोटात असल्याचं संशोधकांना आढळलं आहे. हा शोध भूमध्य सागराच्या पोटात घेण्यात येत आहे. अजूनही येथे उत्खनन सुरू असून त्यातून या शहराविषयी आणखी माहिती गोळा केली जात आहे.

हा रस्ता जवळपास 13 फूट रूंद आहे. हा दगडांना जोडून बांधण्यात आला आहे. सध्या त्यावर माती आणि चिखलाचा जाड थर जमा असून तो दूर झाल्यानंतरच स्पष्ट रस्ता दिसू शकेल. हा भाग आधी जमिनीवर होता. मात्र भूगर्भातील हालचालींमुळे तो पाण्याच्या आत लुप्त झाला.