
जिह्यातील नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्या प्रकरणात शुक्रवारी (दि. 29) विशेष न्यायालयात सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यासह त्यांची उलटतपासणी झाली. चिमुरडीची आई, वडील, पीडितेच्या मृत्यूच्या कारणांचा पंचनामा करणारे पंच आणि आरोपीला पीडिते बरोबर पाहणाऱ्या साक्षीदारांचा यामध्ये समावेश आहे.
साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर 1 मे रोजी अत्याचार करून तिचा खून केल्या प्रकरणी भीमराव कांबळे (वय 65) याला अटक करण्यात आली.या प्रकरणी गुरुवारी (दि. 28) झालेल्या सुनावणीमध्ये कांबळे याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या वेळी एकून 82 साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे विषेश न्यायालयात सादर करण्यात आली आहे.

























































