पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाचा डेन्मार्कवर ३-२ अशा गोलने विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मॉस्को

विश्वचषकामध्ये रविवारी झालेल्या चौथ्या बाद फेरीच्या सामन्यामध्ये क्रोएशियाने डेन्मार्कला पेनल्टी शूट आउट मध्ये ३-२ अशा फरकाने हरवले.सामन्याच्या सुरूवातीलाच पहिल्याच मिनिटाला जोर्गनसनने गोल मारुन डेन्मार्क १- ० अशी आघाडी मिळवून दिली. पण क्रोएशियातर्फे मारियो मेंडझुकिझने चौथ्याच मिनिटाला गोल मारुन संघाला बरोबरी मिळवून दिली.

यानंतर दोन्ही संघाला गोल मारण्यात अपयश आले. डेन्मार्कला आणखी एक गोल मारण्याची संधी मिळाली खरी पण क्रोएशियाच्या गोलकिपरने हा प्रयत्न हाणून पाडला. या सामना निर्धारित पूर्ण वेळेत १- १ अशी बरोबरी सुटला . त्यांमुळे अतिरिक्त वेळ देण्यात आला. पण अतिरिक्त वेळेत ही बरोबरी कायम राहील्याने हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहचला. पेनल्टी शूट मध्ये क्रोएशियाच्या गोलकिपर सुबासिचने ३ गोल आडवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या विजयाबरोवरच क्रोएशियाने २० वर्षांनंतर नंतर उपात्यफेरीत प्रवेश मिळवला. उपात्यफेरीमध्ये त्याचा सामना ७ जुलैला रूस सोबत होईल.

पेनल्टी शूट आउट मध्ये यांनी केले गोल.

पेनल्टी शूट आउट मध्ये क्रोएशिया कडून एंद्रेज करामारिक, मोड्रिक व रेकिटिकने गोल केले. मिशेल क्रोन – डेली व सिमोन काएर डेन्मार्कसाठी दोन गोल केले.डेन्मार्कडून क्रिस्टियन एरिकसन, लासे शोने व जोग्रेनसन गोल करण्यात अपयशी ठरले.