कमिन्स, स्टार्क, हेजलवुड यांना विश्रांती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामान ऑनलाईन, मेलबर्न

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) हिंदुस्थानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क व जोश हेजलवूड या वेगवान त्रिकुटाला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.

भरगच्च वेळापत्रक आणि आगामी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 12 जानेवारीपासून हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय मालिकेस प्रारंभ होणार आहे. इंग्लंडमधील विश्वचषक आणि प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेसाठी हे वेगवान त्रिकूट तंदुरुस्त रहावे, यासाठी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर या त्रिकुटाला हिंदुस्थानविरुद्धची एकदिवसीय मालिका व श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देणार आहेत.