
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेता सलमान खान याच्या गाजलेल्या दबंग सिरीजमधील तिसऱ्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दबंग3 च्या चित्रीकरणाला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार असून सलमान खान व त्याचा मोठा भाऊ अरबाज खान यांनी ट्विटरवरून याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Back in our birthplace for #Dabangg3 shoot @arbaazSkhan pic.twitter.com/JO9pH1X7Rf
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 31, 2019
दबंग-3 च्या पहिल्या शेड्यूलचे चित्रीकरण इंदूरमध्ये होणार आहे. इंदूरमध्येच अरबाज व सलामन खानचा जन्म झाला आहे, याबाबत त्यांनीच या व्हिडीओतून सांगितले आहे. इंदूरमधील महेश्वर व मंडलेश्वर येथे या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. सलमान खानच्या दबंग3 मध्ये सुदीप हा दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.































































