दादर-मडगाव जनशताब्दी 2 मार्चपासून दररोज धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर-मडगाव जनशताब्दी स्पेशल गाडी आता 2 मार्चपासून दररोज धावणार आहे. लॉकडाऊनमध्ये ही ट्रेन आठवड्यातून पाच वेळा धावत होती. ट्रेन क्र.01151/01152 दादर-मडगाव जनशताब्दी स्पेशल गाडीच्या मंगळवार आणि शुक्रवारच्या वाढीव फेऱ्यांच्या तिकिटांचे आरक्षण आजपासून सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. या ट्रेनचे वेळापत्रक, थांबे आणि डब्यांच्या रचनेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.