
दादर संस्कार वर्गाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालदिंडी आणि पालखी सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, 10 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाइन दिंडी तर सायंकाळी 4 वाजता ऑफलाइन दिंडी दादर येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात प्रस्थान करेल. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा गजर करीत बाल वारकरी पारंपरिक तसेच संतांच्या वेशभूषेत वारीत सहभागी होणार आहेत. राज्यभरासह अगदी अमेरिकेतूनदेखील आषाढी वारीच्या ध्वनिचित्रफिती दादर संस्कार वर्गाकडे पाठविण्यात आल्या आहेत.
























































