Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’11ऑक्टोबर’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Tuesday, October 11, 2022)
आर्थिक अनुकूलता लाभेल. गुंतवणुकीवर भर द्याल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. मिळालेली संधी सोडू नका. लेखन व्यवहार जपून कराल. जुन्या मैत्रिणीची बऱ्याच वर्षांनी भेट होईल. आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग : हिरवा

वृषभ (TAURUS – Tuesday, October 11, 2022)
प्रयत्न केल्यामुळे व्यवसायाच्या नव्या संधी प्राप्त होतील. समाजात नवीन ओळख मिळेल. महत्त्वपूर्ण कार्य करावे लागण्याची शक्यता आहे. आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रात प्रगती होईल. नव्या संकल्पना सुचतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मन मारून जगू नका.
शुभरंग : पिवळा

मिथुन (GEMINI – Tuesday, October 11, 2022)
नाते कायमस्वरुपी जपण्यासाठी प्रयत्न करा. कार्यालयात सतर्क रहावे लागेल. देण्याघेण्याचे व्यवहार करताना सावधानता बाळगा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कोणाचीही खोटी स्तुती करायला जाऊ नका. आहारात पालेभाज्यांचा समावेश करा.
शुभरंग : किरमिजी

कर्क (CANCER – Tuesday,October 11, 2022)
चहूबाजूने परिस्थिती अनुकूल असेल. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहाल. पदप्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेली संधी सोडू नका. जुन्या आठवणीत रमून जाल. सायंकाळी स्वत:साठी वेळ काढा. धार्मिक पुस्तकांचे वाचन करावेसे वाटेल. घरात नव्या शोभेच्या वस्तू आणाल.
शुभरंग : मोरपिसी

सिंह (LEO – Tuesday, October 11, 2022)
आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. आज मित्रांमध्ये रमाल. पद-प्रतिष्ठा वाढेल. आत्मविश्वास वाढणाऱ्या घटना घडतील. दररोज सकाळी हिरव्या गवतावरून चाला. मनमोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी आज वेळ काढाल. आरोग्याची तपासणी करून घ्या.
शुभरंग : निळा

कन्या (VIRGO – Tuesday, October 11, 2022)
दूरच्या प्रवासाचा योग आहे. सगळ्यांच्या हिताचा आणि सकारात्मक विचार मनात करा. भागीदारीत फायदा होईल. कुटुंबातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. आजचा दिवस यशस्वीतेचा आहे. आवडता पोषाख परिधान करा. इतरांना गोडधोड खाऊ घालाल. अनपेक्षितपणे घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : गुलाबी

तूळ (TULA- Tuesday,October 11, 2022)
पूर्ण खात्री झाल्यावरच कोणताही निर्णय घ्याल. संधीचे सोने करा. स्वत:कडे लक्ष द्या. आर्थिक सुबत्ता लाभेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मनमोकळेपणे स्वत:चे मत मांडायला शिका. आवडता पदार्थ खायला मिळेल. उगाचच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका.
शुभरंग : किरमिजी

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, October 11, 2022)
मित्रमैत्रिणींशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित होतील. महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे. नम्रता बाळगा. आरोग्याची काळजी घ्या. पिंपळाच्या झाडाला नमस्कार करा. गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा. प्रवास घडेल. सकारात्मक विचार करा. आवश्यक तेवढेच बोलाल.
शुभरंग : आकाशी

धनु (SAGITTARIUS – Tuesday, October 11, 2022)
प्रवासाचा विशेष आनंद अनुभवाल. पूर्ण खात्री झाल्यावरच कोणताही निर्णय घ्या. कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी त्याची तयारी करा. हुशारीने काम करत राहा. स्वतछतयारीसह पुढे जा. हुशारीने काम करत राहा. वैयक्तिक बाबींवर लक्ष केंद्रित केले जाईल
शुभरंग : खाकी

मकर ( CAPRICORN -Tuesday, October 11, 2022)
उधारीचा व्यवहार कोणाबरोबर करू नका. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहिल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कार्यालयात वरिष्ठांकडून कौतुक होईल. आराध्यदेवतेला प्रार्थना करा. नवीन कपड्यांची खरेदी कराल. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा.
शुभरंग : राखाडी

कुंभ (AQUARIUS – Tuesday, October 11, 2022)
पिंपळाच्या वृक्षाला पाणी घालून प्रार्थना करा. जबाबदाऱ्या पार पाडाल. सुख-सौख्य लाभेल. स्वत:साठी वेळ काढा. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. मित्र परिवारात रमाल. आजचा दिवस आपल्यासाठी नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. घरात सुगंधी फुले ठेवा.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Tuesday, October 11, 2022)
हाती घेतलेले काम सफलतेने पूर्ण कराल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. चिमण्यांना दाणे खाऊ घाला. परोपकार कराल. सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावा. प्रिय व्यक्तिची भेट होईल. आराध्यदेवतेची उपासना करा. आवडीचे स्तोत्र म्हणा. मनातली इच्छा पूर्ण होईल.
शुभरंग : लाल