‘सामना’चे विठ्ठल देवकाते यांना उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कार

69

सामना प्रतिनिधी । पुणे

महाराष्ट्रीय मंडळ टिळक रोडच्या वतीने दिला जाणारा कै. कॅप्टन शिवरामपंत दामले क्रीडा पुरस्कार यंदा माजी आंतरराष्ट्रीय ऍथलीट व मार्गदर्शक राम भागवत यांना, तर कै. लेफ्टनंट जनरल य. द. सहस्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कार दै. ‘सामना’चे विठ्ठल देवकाते यांना जाहीर झाला, अशी माहिती महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी दिली.

महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक कै. कॅप्टन शिकरामपंत दामले यांच्या स्मरणार्थ व्यायाम, क्रीडा, सैनिकी क शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या क्रीडा कार्यकर्त्यास 1998 सालापासून ‘दामले क्रीडा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो. 25 हजार रुपये रोख, शाल-श्रीफळ क स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होय. या वर्षीचा हा पुरस्कार कै. कॅप्टन शिवरामपंत दामले यांच्या 42 व्या स्मृतिदिनानिमित्त 28 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या नूतन प्रेक्षकगृहात होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. नंदू फडके यांची उपस्थिती असेल.

आपली प्रतिक्रिया द्या