दैनिक सामनाचे कर्मचारी नारायण भागवत यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती संभाजीनगरमधील दैनिक ‘सामना’ चे कर्मचारी व हडको एन-11 मधील नवजीवन कॉलनी येथील रहिवासी नारायण तुकाराम भागवत (56, मुळ रा. उंडणगाव) यांचे रविवारीदुपारी 4.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री 9 वाजता जळगाव रोडवरील एन-11 येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे, 3 भाऊ, 4 बहिणी असा परिवार आहे.