लातूरमध्ये विहिरीत सापडला मृतदेह, खून झाल्याचा निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

लातूर शहरातील गोरक्षणमधील विहिरीत आज सकाळी मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली. सदरील मृतदेह भावडासिंग जुन्नी याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विहिरीत टाकून दिल्याचे निदर्शनास आले आहे.

लातूर शहरातील गोरक्षणमधील विहिरीत एक मृतदेह असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि इतरांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सदर मृतदेह लातुरातील कुख्यात भावडासिंग जुन्नी याचा असल्याचे निदर्शनास आले. मागील तीन दिवसांपासून तो घरातून गायब असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा निर्घृणपणे खून करून नंतर मृतदेह विहिरीत टाकण्यात आला आहे. हा खून करणे एक दोघांचे काम नाही तर पाच – सहा जणांचे काम असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कोणतीही गडबड होऊ नये यासाठी पोलीसांनी बंदोबस्त वाढवला होता. शासकीय सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.