अंतर्गत मूल्यमापनाचे गुण अपलोड करण्यास 28 जूनपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीएसई बोर्डाने शाळांना बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी 28 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच ज्या शाळांचे अंतर्गत मूल्यमापन आणि प्रॅक्टिकल परीक्षा अद्याप झाली नसल्यास यापुढे ती ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या सूचनाही शाळांना दिल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने यासंबंधी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. याआधी शाळांना बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण अपलोड करण्यासाठी 11 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शाळांना काही विषयांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण वेबसाईटवर अपलोड करता आले नाहीत. तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षाही घेता आलेल्या नाहीत. त्यामुळे ही मुदतवाढ दिल्याचे सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक डॉ. एस. भारद्वाज यांनी स्पष्ट केले.