
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या 5311 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्याकरिता 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. तसेच सोडतीतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत सहभाग घेणाऱ्या अर्जदारांना लवकरच स्वीकृती पत्र ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात येणार असल्याचा निर्णय मंडळातर्फे जाहीर करण्यात आला आहे.


























































