‘पोस्को’ कायद्यात सुधारणा, बलात्कार प्रकरणात आता गुन्हेगाराला फाशीच

184

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण तसेच बलात्कारासारख्या घटना रोखण्यासाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पोस्को कायद्यात सुधारणा केली. त्यामुळे आता असे गुन्हे करणार्‍यांना फाशीची शिक्षा होणार आहे.

अल्पवयीन मुलांवरील वाढत्या गुन्हय़ांबद्दल देशभरातून चिंता व्यक्त केली जात होती. अशा गुन्हांबद्दल कठोर शिक्षा करावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सशुअल ऑफेन्स (पोस्को) कायद्यात सुधारणा करण्यात आली. या सुधारणेमुळे चाईल्ड पोर्नोग्राफी चित्रित करणाऱया आणि वितरित करणार्‍यांनाही दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ‘लहान मुलांच्या सुरक्षेला लक्षात घेऊन त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी या कायद्यात घेण्यात आली आहे,’ असे सरकारने स्पष्ट केले.

  • पोस्को कायद्यातील कलम 2, 4, 5, 6, 9, 14, 15, 34, 42 आणि 45 या कलमात सुधारणा करण्यात आली आहे.
  • कलम 4, 5 आणि 6 मधील सुधारणांमुळे गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होणार आहे.
  • कलम 14 आणि 15 बाललैंगिक साहित्य बनवणे, विकणे आणि वितरित करणाऱयावर कायद्याचा बडगा उचलला जाईल.
आपली प्रतिक्रिया द्या