मुसळधार पावसामुळे डेक्कन एक्सप्रेस रद्द, दोन गाड्यांच्या मार्गात बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेने मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस रद्द केली आहे. मध्य रेल्वे तशी सूचना जाहीर केली असून प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

शनिवारी पुण्याहून मुंबईला निघणारी डेक्कन एक्सप्रेस तसेच शुक्रवारी मुंबईहून पुण्याला निघणारी डेक्कन एक्सप्रेस व कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आली आहे. तर शुक्रवारी भुसावळहून सुटणारी भुसावळ पुणे एक्सप्रेस व पुण्याहून सुटणारी पुणे भुसावळ एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.