
आफ्रिकेच्या अनेक भागांत इबोलाचे संकट पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 28 मे 2026 पासून दिल्लीत होणारी इंडिया-आफ्रिका फोरम शिखर परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या दक्षिण किवू प्रांतासह आफ्रिकेच्या अनेक भागांमध्ये इबोला विषाणूची प्रकरणे समोर आली आहेत. हिंदुस्थानात या विषाणूचा शिरकाव होऊ नये, यासाठी ही परिषद पुढे ढकलली आहे.


























































