VIDEO: लग्नानंतर दीपिका आणि रणवीर मुंबईत दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  सामना ऑनलाईन । मुंबई

इटलीत विवाह बंधनात अडकल्यानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दीपवीरच्या स्वागतासाठी चाहत्यांनी अलोट गर्दी केली. आता ते दोघे खार येथील त्यांच्या नव्या घरात राहणार आहेत.

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका यांचा इटलीमध्ये कोंकणी आणि सिंधी या दोन्ही पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये विवाहसोहळ्यानंतर हे नवदांपत्य रविवारी मुंबईत परतले. येत्या 28 नोव्हेंबरला मुंबईतील ग्रॅण्ड हयात या अलिशान हॉटेलमध्ये दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलीवूडला आमंत्रण देण्यात आले आहे.