आमदार मुरकुटे यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नेवासा

सोशल मीडियावर भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची बदनामी होईल, अशी आक्षेपार्ह पोष्ट टाकून फेसबूक वर अपलोड केल्याप्रकरणी चार जणांविरूद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

भाजप तालुका उपाध्यक्ष, नगरसेवक सचिन जगन्नाथ नागपुरे यांनी नेवासा पोलिसात तक्रार दिल्यावरून नेवासा पोलिसांनी सचिन पवार, सचिन तागड, अमोल मोरे, विकास शिंदे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

१३ ते १८ जुलै या कालावधीत शनी शिंगणापूर येथील विश्वस्त डॉ. वैभव शेटे, सरपंच बाळासाहेब बनकर, ग्रामस्थ यांनी नोकर भरती प्रक्रिया, देवस्थानच्या वाहनांची माहीती, कामगार पगार पत्रक माहितीकरीता उपोषण केले होते मात्र विद्यमान विश्वस्तांनी नोकर भरती प्रक्रिया रद्द केली, मुळात उपोषणकर्त्यांची नोकर भरती प्रक्रिया रद्दची मागणी नव्हती, असे असतांना उपोषणकर्ते आणि विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याशी चुकीचा संबंध जोडून कामगारांमध्ये आमदारांविरोधात रोष निर्माण करून प्रति उपोषण करण्यास भाग पाडले तसेच आमदार मुरकुटे  यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट फेस बुकवर अपलोड करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सोशल मीडिया मधून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे.