एक नाही, तीन- तीन प्रेयसींचे हट्ट पुरवण्यासाठी डान्सर बनला पाकिटमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीतील गोविंदपुरी पोलिसांनी एका पाकीटमाराला अटक केली आहे. रोहन गिल उर्फ सन्नी (21) असे त्याचे नाव असून त्याच्या चौकशीत पोलिसांनाही चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. रोहनला एक-दोन नव्हे, तर तीन-तीन प्रेयसी आहेत, या तिघींचे हट्ट-लाड हट्ट पुरवण्यासाठी आपण पाकीटमार झाल्याचं रोहनने सांगितले आहे.

मुळचा आगऱ्याचा रहिवासी असलेल्या रोहनने दिल्लीत येऊन डान्सिंगचा कोर्स पूर्ण केला होता. उपजिवीकेचे साधन म्हणून त्याने पार्टी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांत डान्स करायला लागला. मात्र दारू आणि वाईट संगतीमुळे तो बिघडला. त्यातच तीन-तीन प्रेयसी सांभाळताना त्याच्या नाकी नऊ येऊ लागले. तीनही प्रेयसींचे हट्ट पुरवताना पगार पुरत नसल्याने त्याने  पाकीटमारी आणि मोबाईल चोरायला सुरुवात केली.  एका रिक्षाचालकाचा मोबाईल चोरल्याप्रकरणी राहुलला अटक झाली असून ही त्याची वर्षभरातील चौथी अटक आहे. अटक झाल्यानंतर प्रेयसींची शौक पुरवण्यासाठी आपण हा मार्गी स्वीकारल्याचं राहुलने कबूल केले आहे.