
दिल्लीच्या रोहिणी परिसरातील ब्रह्मशक्ती रुग्णालयाच्या आयसीयू विभागात आज आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झाल्याने 64 वर्षांच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत तत्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळल्याचे पोलीस उपायुक्त प्रणव तयाल यांनी स्पष्ट केले आहे.
























































