
अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाविरोधात ‘जमियत उलेमा ए हिंद’ने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. देशातील बहुसंख्य मुस्लिम हे पुनर्विचार याचिका दाखल करावी या मताचे आहेत असे जमियतचे प्रमुख मौलाना अर्शद मदानी यांनी सांगितले.
न्यायालयानेच आम्हाला फेरकिचार याचिका दाखल करण्याचा अधिकार दिला आहे असे मदानी म्हणाले. जमियतप्रमाणेच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) कडून लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. आम्ही आजच पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही. आम्ही आमची पुनर्विचार याचिका तयार केली आहे. 9 डिसेंबरपूर्की आम्ही केव्हाही याचिका दाखल करू असे ‘एआयएमपीएलबी’चे सरचिटणीस जाफरयाब जिलानी यांनी सांगितले.

























































