…म्हणजे मी पक्षाशी संबंध तोडणार असे होत नाही!- ज्योतिरादित्य शिंदे

830

मी माझ्या ट्विटर अकाऊंटवरील संदर्भ आणि पदांचा तपशील एक महिन्यापूर्वीच बदलला आहे. माझ्या ट्विटर खात्यावरील संदर्भात बदल म्हणजे मी काँग्रेस पक्षाशी संबंध तोडण्याचे संकेत नाहीत असे स्पष्ट करीत मीडियाने तसा गैरसमज निर्माण करू नये अशा शब्दांत ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपले मनोगत प्रसिद्धीमाध्यमांसमोर मांडले.

एक महिन्यापूर्वीच मी माझ्या ट्विटर अकाऊंटवरील बायोडेटात बदल केलाय. कारण मला तो संक्षिप्त स्वरूपात ट्विटर बायोवर ठेवायचा होता. तेवढय़ावरून मी काँग्रेस सोडणार, माझ्यात आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यातील मतभेद विकोपाला गेल्याच्या बातम्या मीडियाने पसरवल्या हे योग्य नव्हे, असेही ज्योतिरादित्य म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या