दिल्लीवरील हल्ल्याचा कट उधळला, तीन संशयित दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीवरील दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. आसामच्या एका जत्रेत चाचणीदाखल स्फोट घडवून आणि नंतर दिल्लीत तसाच स्फोट घडवून हल्ला करण्याचा कट होता, मात्र त्याआधीच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आसामच्या गोलपारामधून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली.

इस्लाम, रंजीत अली आणि जमील अशी या तिघांची नावे असून जमाल 12 वी उत्तीर्ण आहे, मुकद्दिर इस्लाम हा वाहनचालक तर रंजीत अली हा फिश ट्रेडिंग फर्ममध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता. हे तिघेही 25 ते 30 वयोगटातील असल्याची माहिती डीसीपी अर्थात पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी दिली.

आयएएसच्या व्हिडीओवरून स्फोटके बनवण्याची प्रेरणा

आयईडी स्फोटके बनवण्यासाठी लागणारे साहित्य या तिघांकडून हस्तगत करण्यात आल्याचे कुशवाह यांनी सांगितले. आयएएसचे असे अनेक व्हिडीओ आहेत ज्यांमध्ये आयईडी बनवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. या व्हिडीयोमधूनच प्रेरणा घेऊन ही स्फोटके तयार करण्यात आल्याचे डीसीपी कुशवाह यांनी सांगितले.

तिन्ही आरोपींचा आयएएसशी संबंध असल्याचा संशय

या तिघा आरोपींचा आयएएस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी करण्याचा या तिघांचा डाव होता, असेही कुशवाह यांनी सांगितले. हे तिघे आसामच्या जत्रेत लोन वुल्फ ऍटेक करणार होते. दरम्यान, या तिघांचा आयएएसशी काही संबंध आहे की नाही याबाबत पुढील तपास सुरू असल्याचेही कुशवाह यांनी स्पष्ट केले. आयईडी बनवण्यासाठीची पावडर या तिघांकडे कोणत्या माध्यमातून आली याबाबतचा तपासही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.