
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. NEET पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. सुमारे तीन तासांपासून ते ठिय्या देऊन होते. त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.
तीन तास सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलं. यावेळी राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्याचा, ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांसोबत काँग्रेस नेत्यांची बाचाबाची देखील झाली. अखेर पोलिसांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले.
या ठिय्या आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यावेळी काँग्रेसने आपल्या पाच मागण्या समोर ठेवल्याचं वृत्त आहे.
काय आहेत काँग्रेसच्या पाच मागण्या?
१. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
२. दोन्ही सभागृहांमध्ये गृहमंत्री यांनी या संदर्भात निवेदन द्यावं.
३. सभागृहात या विषयावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे.
४. सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत.
५. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.
दरम्यान, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेल्यानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी रवाना झाले.
VIDEO | Delhi: Police swoop down on Congress protest site outside Prime Minister’s residence, try to forcibly remove Rahul Gandhi, Akhilesh Yadav and other leaders.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/PgU7xTSpWT
— Press Trust of India (@PTI_News) July 21, 2026





























































