मिर्झापूरच्या चाहत्यांसाठी खूषखबर, दिवेंदूच्या ट्वीटमुळे उत्सुकता वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मिर्झापूर या वेबसिरीजचा पहिला पार्ट प्रचंड गाजला. या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. गेल्या महिन्यात अॅमेझॉन प्राईमने या वेबसिरीजचा दुसरा पार्ट येणार असल्याची घोषणा केली होती. आता या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागाचे शूटींग जवळपास पूर्ण झाले असल्याचे समजते. या वेबसिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा दिवेंदू शर्माने याबाबत एक ट्वीट केले आहे.

दिवेंदूने पंकज त्रिपाठी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो पंकज त्रिपाठी यांनी देखील शेअर केला आहे. दिवेंदूने या फोटोसोबत शूटींग करताना खूप मज्जा आली अशी कॅप्शन दिली आहे. या कॅप्शनमुळे नेटकऱ्यांनी मिर्झापूर पार्ट -2 चे शूटींग पूर्ण झाल्याचा तर्क लावला आहे.

मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिवेंदू शर्मा, विक्रांत मैसी, कुलभूषण खरबंदा, राजेश तैलंग, श्रिया पिळगांवकर, रसिका दुग्गल यांच्या मुख्य भूमिका आहेत.