धोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम

38

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट संघातील यष्टीरक्षक आणि फिनिशर अशी ओळख असणारा महेंद्रसिंगच्या निवृत्तीच्या चर्चा क्रिकेटविश्वात सुरू आहेत. मात्र, आता दोन महिने आपण क्रिकेट खेळणार नसल्याचे धोनीने बीसीसीआयला कळवले आहे. धोनीच्या या भूमिकेमुळे त्याची निवृत्ती आणि वेस्टइंडिज दौऱ्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

महेंद्रसिंग धोनी दोन महिने क्रिकेट खेळणार नसून पॅरासैन्य रेजिमेंटमध्ये दाखल होणार आहे. दोन महिन्यांसाठी पॅरासैन्य रजिमेंटमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतल्याने दोन महिन्यांसाठी कोणत्याही क्रिकेट सामन्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे धोनीने बीसीसीआयला कळवले आहे. मात्र, धोनीने निवृत्तीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माही विश्वचषक सामन्यानंतर निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, धोनीचा क्रिकेटमधून निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे त्याचे व्यवस्थापक अरुण पांडे यांनी स्पष्ट केले आहे. क्रिकटे सोडण्याबाबत माहीने कोणताही विचार केलेला नाही असे ते म्हणाले. विश्वचषकातील संथ खोळानंतर माहीने निवृत्ती घ्यावी, असे क्रिकेटप्रेमींचे म्हणणे होते. तर माही अजूनही चांगला खेळ करत असून तो उत्तम फिनिशर आहे,असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे माहीची निवृत्ती आणि आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची संघात निवड होणार का याबाबतची चर्चा क्रिकेट विश्वात सुरू होती. मात्र, दोन महिने क्रिकेट खेळणार नसल्याचे सांगत माहीने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या