Video – मिसेस श्रीलंका स्पर्धेत विजेतीचा मुकुट हिसकावला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलंबियात नुकत्याच पार पडलेल्या ‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेत मुकुटावरून चांगलाच राडा झाला. पुष्पिका डिसिल्क्हाने पटकावलेला  मुकुट अवघ्या काही क्षणात तिच्याकडून हिसकावण्यात आल्याची  धक्कादायक घटना घडली. या स्पर्धेदरम्यानचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेत पुष्पिका डिसिल्क्हा विजेती ठरली होती. तिला विजेतेपदाचा मुकुटही देण्यात आला. मात्र यानंतर मिसेस वर्ल्ड कॅरोलिन म्हणाली, ही स्पर्धा फक्त विवाहित महिलांसाठी आहे. तुम्ही विवाहित असायला हवं, घटस्फोटीत नाही असा या स्पर्धेचा नियम आहे. पुष्पिकाचा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे ती या स्पर्धेसाठी अपात्र आहे. असे म्हणत कॅरोलिनाने विजेतीपदाचा मुकूट पुष्पिकाकडून खेचला.या प्रकारानंतर पुष्पिकाने फेसबुककर आपली  बाजू मांडली. केवळ श्रीलंका नाहीतर जगभरातील सौंदर्यस्पर्धेच्या इतिहासातील ही अपमानास्पद घटना आहे. माझा घटस्फोट झालेला नाही, आणि जर तसे असेल तर पुरावे द्या, असे पुष्पिका म्हणाली. या घटनेनंतर पुष्पिकाला तिचा मुकूट परत केला आहे.