गुहेत अडकलेल्या फुटबॉलपटूंच्या सुटकेच्या प्रयत्नात कमांडोचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बँकॉक

थायलंडच्या चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये अडकलेल्या किशोरवयीन फुटबॉल संघाच्या बचावासाठी कार्यरत असलेल्या असलेल्या बचाव पथकातील एका व्यक्तीचा ऑक्सिजनअभावी गुदमरून मृत्यू झाला आहे. सरमान कुनुन (३५) असे त्याचे नाव असून ते माजी थाय नेव्ही सीलचे कमांडो होते.

गुहेत अडकलेला फुटबॉल संघ सापडला, पण चार महिन्यांनी बाहेर येणार

सरमान कुनुन हे इतर बचाव पथकासोबत गुहेत अडकलेल्या फुटबॉलपटूंना ऑक्सिजन पुरवण्याचे काम करत होते. मुख्यद्वारापासून जवळपास दोन किमी आत अडकलेल्या फुटबॉलपटूंना रात्री दिडच्या सुमारास ऑक्सिजनचा टँक देऊन ते परतत होते. मात्र परत येत असताना ऑक्सिजनच्या अभावी ते गुदमरू लागले. त्यांच्यासोबत असलेल्या कमांडोने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मृत्यू झाला.

थायलंडच्या अंडर-१६ संघातील या १२ फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक हे गेल्या दोन आठवड्यांपासून चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये अडकले आहेत. या फुटबॉलपटूंना गुहेमधून बाहेर काढण्यासाठी जवळपास तीन ते चार महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे या फुटबॉलपटूंना अन्नपाणी व ऑक्सिजन पुरविण्याचे तसेच त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.