
सामना ऑनलाईन, दिवा
दिवा स्थानकात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमध्ये शिरताच येत नसल्याने संतापलेल्या महिलांना रेल रोको आंदोलन केलं. दिवा स्थानकात सकाळी 6.56 मिनिटांनी मुंबईला जाणारी जलद लोकल आली होती. या लोकल मधील महिलांच्या डब्यात दरवाजात उभ्या असलेल्या महिलांनी दिव्यातील महिला प्रवाशांना डब्यात प्रवेश करून दिला नाही.
@Central_Railway दिवा रेल्वे स्थानकात संतप्त महिला प्रवाशांचे रेल रोको आंदोलन pic.twitter.com/kRGPkjHgw3
— Saamana (@Saamanaonline) April 4, 2019
यामुळे संतापलेल्या महिला प्रवाशांनी दरवाजा अडवणाऱ्या महिलांना दरवाजातून खाली खेचले. यानंर दिव्यातील महिला प्रवाशांनी त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी ही लोकल अडवून धरण्यासाठी रुळावर ठाण मांडले. हा प्रकार जवळपास 15 मिनिटे सुरू होता. या रेल रोको आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोऱ्या वाजला होता.






























































