धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा या वस्तू, होईल लाभ

आज धनत्रयोदशी. आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. धनत्रयोदशीचे पर्व कार्तिक कृष्ण त्रयोदशीला साजरे केले जाते. याचदिवशी समुद्रमंथनादरम्यान अमृत कलश घेऊन देवतांचे वैद्य धन्वंतरी प्रकट झाले होते. निरोगी आरोग्यासाठी धन्वंतरीची उपासना केली जाते.

या दिवशी धन संपत्तीची देवता असलेल्या कुबेराचीही पूजा केली जाते.धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणतात. आजच्या दिवशी मूर्ती व वस्तूंची खरेदी केली जाते. याच मूर्ती आणि वस्तूंची दिवाळीत पूजा केली जाते.

या दिवशी काय खरेदी करावे

कुठलेही धातूचे भांडे या दिवशी खरेदी करावे. पाण्याचे भांडे घेतलेत तर उत्तम.

गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती घ्यावी. या दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या असाव्यात.

बत्तासे, मातीची पणती, मोठा दिवा

जमल्यास अंक असलेले कुठलेही यंत्र खरेदी करावे.

आजच्या दिवशी वरीलपैकी खरेदी केलेल्या कुठल्याही वस्तूची वा मूर्तीची पूजा करावी.

जाणून घ्या या वस्तूंची खरेदी करण्याचे कारण

वर्षभर घरात लक्ष्मी नांदावी. आर्थिक लाभ व्हावा यासाठी पाण्याचे भांडे घेणे उत्तम

व्यवसायात वाढ व्हावी, प्रगती व्हावी यासाठी कुठल्याही धातूचा दिवा घ्यावा.

मुलांच्या प्रगती व निरोगी आरोग्यासाठी ताट किंवा वाटी घ्यावी.

दिर्घायुष्यासाठी धातुपासून तयार केलेली घंटी घ्यावी

घरात सुख मनशांती नांदावी यासाठी ज्यात अन्न शिजवता येईल असे भांडे घ्यावे.

पूजा कशी कराल?

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी उत्तर दिशेला कुबेर आणि धन्वंतरीची स्थापना करावी.

पूजा करतेवेळी “ॐ ह्रीं कुबेराय नमः” या मंत्राचा जप करत राहावा.

दोन्ही देवतांच्या समोर एका वातीचा तूपाचा दिवा लावावा.

कुबेराला सफेद आणि धन्वंतरीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.

त्यानंतर “धन्वन्तरि स्तोत्रा”चे पठण करावे.

प्रसाद ग्रहण करावा

पूजा झाल्यानंतर पैसा साठवण्याच्या ठिकाणी कुबेराला स्थानापन्न करावे. तर पूजाघरात धन्वंतरी ठेवून त्याची पूजा करावी.

खरेदी करण्यासाठी योग्य वेळ
यावेळेला पूजाही करू शकता.
दुपारी 12 ते 1.30 या दरम्यान खरेदी करा.
रात्री 9 ते 10.30 या वेळेतही तुम्ही खरेदी करू शकता.
सकाळी 10.30 से 12.00 या वेळेदरम्यान पूजा किंवा खरेदी करू नये.

आपली प्रतिक्रिया द्या