
दिवाळीनिमित्त शिवसेनेच्या वतीने भायखळावासीयांना सवलतीच्या दरात दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. हजारो भायखळावासीयांनी याचा लाभ घेतला. त्याचबरोबर कोरोनात निराधार झालेल्यांना मोफत फराळाचे वाटप करण्यात आले. शिवसेना उपनेते, पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
कोरोनामुळे गेल्या वर्षीची दिवाळी भीतीच्या छायेखाली गेली. मात्र, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने लसीकरण मोहिमेला वेग दिल्यामुळे शहरात बहुसंख्य लोकांनी लस घेतली. मात्र कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. पेट्रोल, डिझेल, घरगुती स्वयंपाकाचा गॅस तसेच तेलाचे दरही प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची हा मोठा प्रश्न होता. त्या पार्श्वभूमीवर, यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी भायखळावासीयांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी रास्त दरात दिवाळी फराळ साहित्याचा उपक्रम राबवला. अवघ्या 250 रुपयांत 2 किलो रवा, 1 किलो साखर, 2 किलो मैदा, 1 किलो डालडा आणि 2 किलो चना डाळ या उपक्रमाच्या अंतर्गत देण्यात आली. भायखळ्यातील शिवसेनेच्या शाखांमधून हे किट देण्यात आले. यावेळी विधानसभा समन्वयक बबन गावकर, विधानसभा संघटक विजय लिपारे, उपविभागप्रमुख राम सावंत, विजय कामतेकर, नगरसेवक रमाकांत रहाटे, सोनम जामसुतकर, माजी नगरसेवक मनोज जामसुतकर, महिला विधानसभा समन्वयक सुरेखा राऊत, महिला विधानसभा संघटक चंदना साळुंखे, शाखाप्रमुख हेमंत कदम, रमेश रावल, निंगाप्पा चलवादी, हेमंत मयेकर, विनोद शिर्पे, अमीर अन्सारी, ग्राहक कक्षाचे देविदास माडय़े, युवासेनेचे स्वप्निल बागवे व श्रध्दा वाघमारे आदी उपस्थित होते.


























































