या वर्षी नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपूजन एकाच दिवशी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी सणाला सोमवार, 1 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. यंदा गुरुवार, 4 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेरपूजन हे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत.
n सोमवार, 1 नोव्हेंबर रोजी रमा एकादशी आहे. याच दिवशी दिवशी गोवत्स द्वादशी-वसुबारस आहे. सायंकाळी गाय आणि वासरू यांची पूजा करून त्यांना गोड जेवण देण्याची प्रथा आहे.
n मंगळवार, 2 नोव्हेंबर रोजी गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन आणि यमदीपदान आहे. या दिवशी गरीब गरजू लोकांना दीपदान, अन्नदान, वस्त्र्ादान करण्याची प्रथा आहे.
n बुधवार, 3 नोव्हेंबर रोजी आश्विन पृष्ण चतुर्दशी क्षयतिथी आहे. या दिवशी दीपावलीचा कोणताही सण नाही.
n गुरुवार, 4 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपुबेर पूजन आहे. गुरुवार, 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.03 पासून रात्री 8.35 पर्यंत लक्ष्मी-पुबेरपूजन करावयाचे आहे.
n शुक्रवार, 5 नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आहे. तसेच महावीर जैन संवत् 2548 चा प्रारंभ होत आहे. याच दिवशी गोवर्धन पूजन आणि अन्नपूट आहे.
n शनिवार 6 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे.

पुढच्या वर्षी दिवाळी 10 दिवस आधी

पुढील वर्षी दिवाळी 10 दिवस अगोदर येणार आहे. पुढच्या वर्षी बलिप्रतिपदा 26 ऑक्टोबर 2022 रोजी आहे, अशी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. पृ. सोमण यांनी दिली. पुढील वर्षी आश्विन कृसायंकाळी ष्ण अमावास्येच्या दिवशी मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण हिंदुस्थानातून दिसणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.