
सामना ऑनलाईन । लंडन
दक्षिण आफ्रिकेच्या केव्हीन ऍण्डरसनने ६ तास आणि ३५ मिनिटांच्या झुंजीनंतर जॉन इस्नरला हरवले आणि अंतिम फेरीत एण्ट्री मारली. त्यानंतर सर्बियाच्या नोवाक जोकोविचने शनिवारी ५ तास व १५ मिनिटांच्या संघर्षानंतर स्पेनच्या रफाएल नदालला पराभूत करीत जेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. आता मॅरेथॉन लढतींनंतर केव्हीन ऍण्डरसन व नोवाक जोकोविच उद्या विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅम पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. नोवाक जोकोविचने रफाएल नदालचे आव्हान ६-४, ३-६, ७-६, ३-६, १०-८ असे मोडून काढत पाचव्यांदा विम्बल्डनची फायनल गाठली.
z दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन ऍण्डरसन आणि अमेरिकेचा जॉन इस्नर यांच्यातील किम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील उपांत्य लढत साडेसहा तासांपर्यंत रंगली. यात ऍण्डरसनने इस्नरला ६-७ (८-६), ७-६ (५-७), ७-६ (९-११), ६-४, २६-२४ असे नमकून प्रथमच अंतिम फेरीमध्ये धडक दिली. विम्बल्डनमध्ये सर्वाधिक काळ रंगलेली ही दुसऱ्या क्रमांकाची मॅरेथॉन लढत ठरली. याचबरोबर ऍण्डरसन हा तब्बल ९७ वर्षांनंतर या स्पर्धेची फायनल गाठणारा पहिला दक्षिण आफ्रिकन टेनिसपटू ठरला.



























































