बापरे! पोटातून काढले  116 लोखंडी खिळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुंदी

राजस्थानच्या बुंदी जिह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोला शंकर नावाच्या व्यक्तीच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क 116 लोखंडी खिळे, लोखंडाचे तुकडे आणि तारा बाहेर काढल्या आहेत.

गेल्या 20 वर्षांपासून भोला शंकर याची मानसिक स्थिती ढासळलेली आहे. त्याने नोकरीही सोडली आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला डॉक्टरांकडे आणण्यात आले. डॉक्टरांनी जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांना धक्का बसला. सीटी स्कॅननंतर त्याच्या पोटात खिळे, लोखंडाचे तुकडे आढळले. त्यानंतर भोलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशननंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोखंड खाण्याची सवय नडली

भोलावर उपचार करणारे डॉक्टर अनिल सैनी म्हणाले, भोला शंकरच्या पोटात जेव्हा आम्ही लोखंडी तारा, खिळे आणि तुकडे पाहिले तेव्हा आम्हाला धक्काच बसला. आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला त्याच्या नातेवाईकांना दिला. जवळपास दीड तास शस्त्रक्रियेस लागला. पोटातील सर्व लोखंडी वस्तू बाहेर काढण्यात आल्या. यातील लोखंडी खिळ्यांची लांबी 6.5 इंच इतकी आहे.