
या जगात माणसं कोट्यधीश होतात हे तुम्ही ऐकलं असेल. पण, एक कुत्रा जर कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे, हे तुम्हाला समजलं तर कसं वाटेल? पण, खरोखर असं घडलं आहे.
जगात असाही एक कुत्रा आहे, ज्याच्या नावावर 430 कोटींची संपत्ती आहे. या कुत्र्याचं नाव गंथर – 6 असं आहे. या कुत्र्याच्या मालकिणीचं नाव काउंटेस कार्लोटा असं होतं. गंथर 6 पूर्वी गंथर 3 नावाचा कुत्रा या कार्लोटाकडे होता. त्या कुत्र्याच्या नावावर कार्लोटा हिने 1992 साली सगळी संपत्ती केली होती.
त्यानंतर ही संपत्ती गंथर 6 कडे ही संपत्ती आली. यात मियामी इथल्या एक आलिशान हवेलीचा समावेश आहे. या हवेलीला नऊ बेडरूम, आठ बाथरूम आणि स्विमिंग पूल आहे. बंगल्याभोवत बऱ्यापैकी जागा देखील आहे. ही हवेली कधीकाळी प्रसिद्ध हॉलिवूड गायिका मॅडोना हिची होती.
या कुत्र्याच्या देखभालीसाठी संपूर्ण पथक सुसज्ज असतं. गंथर 6ची देखभाल, त्याचं आरोग्य या सगळ्याची काळजी ते वाहतं. गंथर संपूर्ण ऐशोआरामात आपलं जीवन व्यतित करत आहे. तसंच काही काळात ही हवेली विकण्यात येणार असून तिची किंमत 230 कोटी इतकी असणार आहे.




























































