चीनने डोकलाम सीमेवर अण्वस्त्रवाहू विमान तैनात केले, चिनी सैनिकांची संख्या वाढली

लडाख सीमेवरील तणाव कायम असतानाच चीनने आता भूतानशी खेटूनच असलेल्या डोकलाम सीमेवर अण्वस्त्रवाहू विमान तैनात केले आहे. डोकलामपासून जवळच असलेल्या तिबेटमधील गोलमूड एअरबेसवर चीनने सैनिकांची संख्या वाढवली असून येथे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांचा ताफाही आणला आहे. हिंदुस्थानी सीमेपासून 1150 किमीवर हा एअरबेस आहे.

चीनच्या युद्धखोरीमुळे चार महिन्यांपासून लडाख सीमेवर प्रचंड तणाव आहे. गलवान खोNयातील हिंसाचारानंतर चीनने या भागात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. लडाख सीमेवरील काही दुर्गम भागात चिनी लष्कराने अत्याधुनिक क्षेपणास्त्रेही तैनात केली आहेत. आता भूतानशी खेटून असलेल्या डोकलाम सीमेवर चीनने एच 6 हे अण्वस्त्रवाहू विमान तैनात केले आहे. हिंदुस्थानी सीमेपासून 1150 किमी अंतरावर तिबेटमध्ये असलेल्या गोलमूड एअरबेसवर चीनने अण्वस्त्रवाहू विमानाबरोबरच अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांचा ताफाही आणला आहे. यापूर्वी चीनने हे अण्वस्त्रवाहू विमान अक्साई चीनच्या काश्गर एअरबेसवर तैनात केले होते. ओपन सोर्स इंटेलिजन्स अ?ॅना‘िलस्ट ‘डेट्रेस्फा’ ने जारी केलेल्या उपग्रहीय छायाचित्रात विमानाबरोबर केडी 63 हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रही स्पष्ट दिसत आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 200 किमी आहे. याशिवाय एअरबेसवर शियान वाय 20 हे मालवाहू विमानही दिसत आहे.

2017 मध्ये डोकलाममध्ये हिंदुस्थान व चीनचे लष्कर आमनेसामने आले होते. तब्बल 73 दिवसानंतर चीनला आपले सैन्य माघारी घ्यावे लागले होते. डोकलाममध्ये कराराचा भंग करून चीन करत असलेल्या रस्त्याच्या कामाला हिंदुस्थानने रोखले होते. त्यावरून पित्त खवळलेल्या चीनने या भागात फौजफाटा आणला होता. मात्र मुत्सद्देगिरीच्या मैदानावर चीनला माघार घ्यावी लागली.

आपली प्रतिक्रिया द्या