डोंबिवलीकरांचा ‘रिटर्न जर्नी’ बंद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीत एरवी धडधाकट लोकांनाही पिकअवरमध्ये लोकल पकडता येत नाही. त्यामुळ गर्दीचेही ‘माहेरघर’ असलेल्या डोंबिवली स्थानकात अनेक जण गर्दीत हाडे मोडून घेण्यापेक्षा ठाकुर्लीला जाऊन गाडी पकडून मुंबईचा प्रवास करतात. परंतु गेल्या महिनाभरापासून कल्याण दिशेच्या लोकल डोंबिवलीच्या फलाट क्र. 1च्या होम प्लॅटफॉर्मवरून न सोडता फलाट क्र. 2 वरून सोडल्या जात असल्याने डोंबिवली पश्चिमेला राहणाऱया ज्येष्ठ नागरिकांना सकाळी-सकाळी पादचारी पुलाच्या पायऱया चढून फलाट क्रमांक दोन गाठण्याची शिक्षा भोगावी लागत आहे.

मध्य रेल्केने डेंबिकली स्थानकात लोकलच्या वाहतुकीत साधारण महिनाभरापूर्की बदल केला आहे. डोंबिकलीत वर्षानुवर्षांपासून कल्याण दिशेकडे जाणाऱया लोकल फलाट क्रमांक 1 करून सोडण्यात येत होत्या. त्यामुळे डोंबिकली स्थानकाच्या पश्चिमेला राहणाऱया ज्येष्ठ नागरीकांना या धिम्या लोकल पकडून उलटा प्रवास करीत ठाकुर्ली किंवा फार तर कल्याणला उतरून पुन्हा सीएसएमटीच्या दिशेने आपला प्रवास करता येत होता. तसेच पूर्वेकडे राहणाऱया प्रवाशांनाही सरकत्या जिन्याचा वापर करून तसेच व्हीलचेअरसाठी खास ‘रॅम्प’ असल्याने धिम्या लोकल पकडणे सोपे झाले होते.

ज्येष्ठ नागरिकांना मध्य रेल्केची शिक्षा का

50 ते 60 टक्के महिला, ज्येष्ठ नागरिक व जे डोंबिवलीत गर्दीच्या गाडीत चढू शकत नाहीत असे प्रवासी हे ठाकुर्ली, कल्याण येथे जाऊन लोकल पकडत उलट दिशेचा प्रकास करीत असतात, अशा पश्चिमेकडील ज्येष्ठ नागरिकांना सकाळच्या गर्दीत पुलाचे जिने चढायची शिक्षा मध्य रेल्केने दिली असल्याचे प्रवासी बळीराम राणे यांनी म्हटले आहे.

कल्याण दिशेचा पूल लवकर बांधणे गरजेचे

डोंबिवली स्थानकात फलाट क्रमांक एकच्या होम फलाटावरून कल्याण दिशेने लोकल नेताना वक्रावार मार्ग असल्याने गाडी स्टेशनात शिरण्यापूर्वी आणि नंतर दर ताशी 15 कि.मी.चे वेगाचे निर्बंध आहे; परंतु फलाट क्र. 2 करून डाऊन लोकल सुटताना दर ताशी 50 कि.मी.वेगाने लोकल जात असल्याने प्रत्येक लोकलची तीन मिनिटे वाचणार असल्याने त्याचा फायदा एकंदरच वेळापत्रकाला होत आहे. त्यामुळे डाऊन लोकल वेळेत कर्जत कसारा खोपोली अशा मुक्कामी पोहचून पुन्हा सीएसएमटीच्या अप दिशेने सुटणाऱया लोकलना त्याचा खूपच फायदा होत आहे. डोंबिवलीत कल्याण दिशेचा पादचारी पूल धोकादायक ठरवून तोडण्यात आला असून तो लवकर बांधण्याची मागणी होत आहे. कारण, या ब्रिजला लिफ्ट असल्याने ज्येष्ठ नागरीकांना त्याचा फायदा होणार असल्याचे मध्य रेल्केच्या सूत्रांनी स्पष्ट केले.