
सामना प्रतिनिधी । हाळी हंडरगुळी
हाळी हंडरगुळी येथील महादेव मंदिर व दत्त मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. या चोरी प्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव मंदिर व दत्त मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास फोडली. दानपेटी फोडणारा चोरटा सिसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. यापूर्वीही येथील बाजारपेठेतील तब्बल १२ दुकाने चोरट्यांनी फोडलेली होती. त्यावेळीही चोरटे सिसीटीव्हीमध्ये दिसून आले होते. परंतु पोलिसांना त्यांना अटक करणे शक्य झाले नाही. आता पुन्हा मंदिरातील दानपेटी फोडण्यात आली आहे. सिसीटीव्ही फुटेज उपलब्ध असताना तरी किमान पोलिसांनी चोरट्यास पकडले पाहिजे, अशी भावना व्यक्त होत आहे.

























































