प्रजनन क्षमता चाचणी

नेहमीच्या आरोग्य तपासणीमध्ये कालेस्टेरालची पातळी, रक्तदाब आणि मधुमेहसारख्या सामान्य चाचण्यांचा समावेश असतो. मात्र याव्यतिरिक्त काही चाचण्या आहेत, ज्या वेळीच करणे गरजेचे आहे.

प्रजनन चाचणी ही स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजनन आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

ओह्युलेशन मॉनिटरिंग – ओह्युलेशनची नियमितता आणि अंदाज समजून घेतल्याने स्त्रियांना त्यांच्या प्रजननाचे योग्य दिवस ओळखण्यास मदत होईल.

संप्रेरक पातळी – संप्रेरक चाचणीत  फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH), ल्युटेनिझिंग हार्मोन (LH), इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांचा समावेश आहे. प्रजनन आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हार्मोनल संतुलनाविषयी माहिती मिळते. मासिक पाळीचे टप्पे समजतात. त्यामध्ये फॉलिक्युलर फेज (Follicular Phase), ओह्युलेशन (Ovulation) आणि ल्युटल फेज (Luteal Phase) हे तीन महत्त्वाचे टप्पे असतात.

ओव्हेरियन रिझर्व्ह – ओव्हेरियन रिझर्व्ह म्हणजे जर एखादी स्त्राr लगेच गर्भधारणेची योजना करू शकत नसेल तर ती एग फ्रिजिंगचा पर्याय निवडू शकते.

थायरॉईड चाचण्याः थायरॉईड विकार प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात. या चाचणीत थायरॉईडचे आरोग्य गर्भधारणेसाठी अनुकूल असल्याची खात्री होते.

सीमन अॅनालिसिस – या चाचणीत पुरुषांच्या शुक्राणूचे आरोग्य आणि विकास क्षमतेबाबत माहिती मिळते. यात शुक्राणूंची संख्या, त्यांचा आकार आणि त्यांची हालचाल यांचे निरीक्षण केले जाते.

संप्रेरक पातळीः पुरुषांमधील हार्मोनल असंतुलन, हे प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात.

जनुकीय चाचणीः शुक्राणूंची संख्या कमी असेल तर त्याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला आनुवंशिकतेमुळे वंध्यत्वाची समस्या जाणवत आहे. यासाठी तुमच्या शुक्राणूचा नमुना घेऊन तपासणी केली जाते.

प्रजनन चाचण्यांचे फायदे

प्रजनन चाचण्या कोणत्याही आंतरिक पुनरुत्पादक आरोग्य समस्या ओळखण्यास मदत करतात.

जोडप्यांना कुटुंब नियोजन, गर्भधारणेची वेळ आणि आवश्यक असल्यास संभाव्य प्रजनन उपचारांबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेता येतात.

तुमची प्रजनन क्षमता जाणून घेतल्याने गर्भधारणेशी संबंधित तणाव आणि अनिश्चितता कमी होऊ शकते.

हे सक्रिय पाऊल तुमचे आरोग्य व प्रजनन उपचारांबद्दल आवश्यक ज्ञान देते.

(डॉ. युगाली वराडे, प्रजनन सल्लागार, नोव्हा आयव्हीएफ, मुंबई)